American/ Hawaiian Jui (White flowers) अमेरिकन किंवा हवायन जुई

American/ Hawaiian Jui (White flowers) अमेरिकन किंवा हवायन जुई. फुल दिसायला थोडं प्राजक्ताच्या फुलासारखं दिसतं पण सुगंध जुईचाच आहे.

Red - Orange Flowers in garden (हळदी-कुंकवाचं झाड- केसरिया)

केसरिया! या फुलझाडाचं नाव माहिती नाही पण पिवळ्या-लाल अशा एकत्रित शेडमुळे हळदी-कुंकवाचं झाड म्हणतात असं ऐकून आहे. आमच्या घरी श्रीरामपूरला जे झाड होतं त्याला जर्द पिवळ्या आणि लाल रंगाच्या पाकळ्या असलेली फुलं यायची. माझ्याकडे आहे त्याला जरा केशरट येतात.